Bavdhan News : क्रीडा शिक्षकाने केला अल्पवयीन खेळाडू मुलीचा विनयभंग

एमपीसी न्यूज – बॅडमिंटन शिकविणाऱ्या शिक्षकाने अल्पवयीन खेळाडू मुलीचा विनयभंग केला. ही घटना बालेवाडी येथे शनिवारी (दि. 2) सकाळी घडली.

राकेश यशवंत दलाल (वय 36, रा. नांदे रोड, म्हाळुंगे, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अल्पवयीन मुलीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दलाल हा बालेवाडी येथे बॅडमिंटन शिकविण्याचे काम करतो. शनिवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास शटल बॉक्‍स हे जीममधील लॉकरमध्ये ठेवण्यास सांगितले. अल्पवयीन मुलगी ते साहित्य ठेवण्यास गेली असता आरोपी तिथे गेला.

त्याने ‘तू शुक्रवारी का खेळायला येत नाहीस. तू चांगली खेळाडू आहेस. मला तुला फार वरती घेऊन जायचे आहे, असे म्हणत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.