Pune News : 20 वर्षीय तरुणीवर चारचाकीत बलात्कार, आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज : घराशेजारी राहणाऱ्या वीस वर्षीय तरुणीला जेवण करण्याच्या निमित्ताने बाहेर घेऊन जात तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चंदन नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील खराडी ते लोणी काळभोरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत ही घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. 

विवेक सिद्धार्थ गाडेकर (वय 30) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एका 20 वर्षीय तरुणीने चंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे शेजारी असून ते एकमेकांना ओळखतात. गुरुवारी आरोपीने फिर्यादीला आपण बाहेर जेवायला जाऊ, मला तुझ्याबरोबर वेळ घालवायचा आहे असे म्हणून चारचाकी गाडीतून तिला घेऊन बाहेर गेला. चंदन नगर परिसरातील एका ढाब्यावर त्यांनी जेवण केले. त्यानंतर घरी परत जात असताना रस्त्याच्या बाजूला गाडी थांबवून फिर्यादी सोबत बलात्कार केला आहे.

दरम्यान या सर्व प्रकारानंतर फिर्यादीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.