Pimpri News : बनावट जीन्स विक्री प्रकरणी पिंपरीतील विक्रेत्याला अटक

कॉपीराइट ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल 

एमपीसी न्यूज – विनापरवाना कंपनीचा लोगो वापरुन बनावट जीन्स विक्री प्रकरणी पिंपरीतील विक्रेत्याला अटक केली आहे. सुपरड्राय कंपनीने दिलेल्या तक्रारीवरून विक्रेत्यांवर कॉपीराइट ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लिजेंडस् चॉईस, साई चौक, पिंपरी येथे रविवारी (दि.03) ही कारवाई करण्यात आली. 

इस्माईल इस्तेखार खान (वय 26, रा. एस एन बी पी, मोरवाडी, पिंपरी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याबाबत महेंद्र सोहन सिंग (वय 36, रा. कसबा पेठ, पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने सुपरड्राय कंपनीच्या बनावट जीन्स दुकानात विक्रीसाठी ठेवल्या होत्या. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून दुकानदाराला अटक केली आहे. दुकानात 25 लाख 60 हजार रुपये किंमतीच्या 512 जीन्स आढळून आल्या. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.