Chinchwad News : पिंपरी चिंचवड शहरात चोरीचे सत्र थांबेना; आणखी आठ चोरीच्या घटना उघड

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. चोरीच्या घटना थांबता थांबेनात. शहरातील भोसरी, तळेगाव दाभाडे, चिखली, एमआयडीसी भोसरी, देहूरोड, हिंजवडी, चाकण, पिंपरी परिसरात चोरीच्या आणखी आठ घटना उघडकीस आल्या आहेत. त्यात चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. त्यातील सहा घटना वाहन चोरीच्या आहेत.

आदिनाथ नगर भोसरी येथून अज्ञात चोरट्याने इको गाडीचा 20 हजार रुपये किमतीचा सायलेन्सर कापून चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 13) सकाळी उघडकीस अली असून याप्रकरणी संतोष मुगुटराव काळे (वय 34) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ओझर्डे गावात शैलेश राजाराम पारखी (वय 28) हे नळाच्या कट्ट्याजवळ हात पाय धूत असताना अज्ञात चोरट्याने त्यांचा साडेसहा हजरांचा मोबाईल फोन चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 12) मध्यरात्री एक वाजता घडली.

संकेत मोहन लिमन (वय 21, रा. सहयोगनगर तळवडे) यांची 15 हजारांची दुचाकी त्यांच्या घरापासून चोरीला गेली. त्यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजराखन रमाकांत पटेल (वय 22, रा. आंबी सर्कल, ता. मावळ) यांची 50 हजारांची दुचाकी त्यांच्या घराजवळून चोरीला गेली आहे. पटेल यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नितीन प्रकाश तरस (वय 32, रा. विकासनगर, देहूरोड) यांची 15 हजारांची दुचाकी मुकाई मंदिर देहूरोड येथून चोरीला गेली. हा प्रकार रविवारी सायंकाळी पाच वाजता घडला. त्यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विजय मधुकर विभुते (वय 31, रा. साखरेवस्ती, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची 10 हजारांची दुचाकी सोमवारी दुपारी दीड वाजता हिंजवडी मधील शिवाजी चौकातून चोरीला गेली. राजू नाथा काकडे (वय 43, रा. कुरुळी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांची 40 हजारांची दुचाकी त्यांच्या घरासमोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

नागनाथ वैजनाथ कोरे (वय 27, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची 15 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेतून चोरून नेली. हा प्रकार 10 डिसेंबर रोजी उघडकीस आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.