Hinjawadi : जीपीएस ट्रॅकरमुळे पतीचे विवाहबाह्य संबंधाचे बिंग फुटले

एमपीसी न्यूज – पत्नीने पतीच्या कारमध्ये जीपीएस ट्रॅकर बसवले आणि पतीचा माग काढला. त्यावेळी पत्नीला भलतेच प्रकरण समजले. पत्नीच्या नावाने एका वेगळ्याच महिलेने हॉटेलमध्ये चेकइन केले असून ती चक्क पत्नी म्हणून हॉटेलमध्ये राहत होती. याबाबत पत्नीने तिचे नाव व आधारकार्ड वापरून तोतयागिरी केल्याबाबत पतीसह, एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला. हा प्रकार 21 ऑक्टोबर 2020 रोजी बावधन येथील व्हिवा इन हॉटेल येथे घडला.

अरिफ अब्दुल मांजरा (वय 41, रा. मसाला, ता. मांगरोड, जि. सुरत), मेघा सोंडी (रा. यमुनानगर चंदिगढ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. आरोपी अरिफ याच्या पत्नीने याप्रकरणी 1 फेब्रुवारी 2022 रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा आणि आरोपी अरिफ यांचा सन 2005 मध्ये सुरत येथे विवाह झाला. लग्नानंतर पती अरिफ कामानिमित्त बेंगलोर येथे जात होते. दरम्यान त्यांचे वागणे फिर्यादी यांना संशयास्पद वाटले. 21 ऑक्टोबर 2020 रोजी फिर्यादी यांनी अरिफच्या फॉर्च्युनर कार (जी जे 19 / ए एफ 4567) मध्ये जीपीएस डिव्हाईस लावले.

त्यानंतर अरिफ याचे लोकेशन बावधन येथील हॉटेल व्हिवा असे दाखवले. त्यामुळे फिर्यादी यांनी इंटरनेटवरून हॉटेलचा संपर्क क्रमांक मिळवून त्यावर फोन करून अरिफ हॉटेल मध्ये आले आहेत का, अशी चौकशी केली. त्यावेळी अरिफ आणि त्याच्यासोबत त्याची पत्नी समीम मांजरा असल्याचे हॉटेलमधून समजले.

त्यानंतर नोव्हेंबर 2020 मध्ये फिर्यादी यांनी हॉटेलमध्ये जाऊन माहिती घेतली असता पती अरिफ याच्यासोबत एक महिला फिर्यादी यांचे आधारकार्ड वापरून राहिल्याचे समजले. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात मेघा सोंडी ही महिला असल्याचे उघड झाले. याबाबत फिर्यादी यांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक एम बोरकर तपास करीत आहेत.

https://youtu.be/E3jTgxKBl8g

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.